Share

मंत्री गुलाबराव पाटील यांचं ट्विटर अकाउंट हॅक ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाविकास आघाडी सरकामधील पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं ट्विटवर अकाउंट हॅक झाल्याचे समजतेय. गुलाबराव पाटील यांच्या ट्विटवर अकाउंट प्रोफाइल फोटोच्या जागी भलत्याच कोणाचा फोटो दिसत आहे. त्यामुळं प्रथमतः गुलाबराव पाटील यांचे ट्विटवर अकाउंट हॅक झाल्याचे समजतेय.

गुलाबराव पाटील हे नेहमीच त्यांच्या ट्विटर वरून त्यांचे विचार लोकांशी शेअर करत असतात. तसेच ट्विटर आणि फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते नेहमीच त्यांच्या लोकांच्या संपर्कात असतात. आता त्यांचं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची बातमी सोशल मीडियावर वेगानं पसरली आहे. पाटील यांचे ट्विटरवर १२ हजार ३०० फॉलोअर्स आहेत.

याशिवाय गुलाबराव पाटील यांचे ट्विटवर अकाउंट लॉक झाल्याचे चिन्ह त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवर दिसत आहे. सोबतच त्यांच्या ट्विटर टाइमलाईनवरील त्यांनी केलेलं एकही ट्विट दिसत नाहीये.

दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या ट्विटर अकाउंटबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून ट्विटरवरील गुलाबराव पाटील यांचे फॉलोअर्स त्यांचे अकाउंट हॅक झाल्याचे ट्विट करत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!