Share

लातूर परिसरात गारपीट, पंचनामे करण्याचे आमदारांचे निर्देश

Published On: 

लातूर: शहर व तालुक्यात शनिवारी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी चारच्या सुमारास पाऊसाला सुरुवात झाली त्यानंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाने चांगलाच जोर धरला. या पाऊसात शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

आधीच शेतकऱ्यांवर कोरोनाचे सावट त्यात अवकाळी पाऊसाने हजेरी लाऊन भाजीपाला तसेच फळ भाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने आंब्याचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही दिवसातच आंबे बाजारात येणार आहेत पण त्या पूर्वीच अवकाळी पावसाने आंब्याचे नुकसान केले. त्यामुळे आंब्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

लातूर जिल्ह्यात झालेल्या या अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे, या नुकसानीचे शासनाने तत्काळ पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे निर्देश कॉंग्रेस नेते धीरज देशमुख यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानी बद्दल राज्य सरकार नक्की मदत करेल अशी अपेक्षा धीरज देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!