Share

बीडची परिस्थिती चिंताजनक, एका दिवसात विक्रमी १०६२ रुग्णांची वाढ

Published On: 

बीड : जिल्ह्याच कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. दिवसभराच तब्बल विक्रमी १०६२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. यात सर्वाधिक अंबाजोगाईमध्ये २२३ रुग्ण आढळले आहेत. तर आष्टी १९३, बीड २२०, धारूर ३०, गेवराई ६४, केज १०६, माजलगाव ३४, परळी ७५, पाटोदा ५३, शिरूर ४५, वडवणी १९ रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मृत्युचा आकडाही वाढू लागला आहे.

अंबाजोगाईमध्ये कोरोनाबाधित उपचार घेत असलेल्या रुग्णालयात मृत रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या ४८ तासात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सात जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तर रविवारी सहा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि तीन जणांचे अंत्यसंस्कार वेटिंगवर आहेत.

दरम्यान, अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रुग्णांची संख्या प्रचंड असल्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. लातूर येथून अंबाजोगाईला ऑक्सिजन उपलब्ध करून दिले जाते. पण लातूर येथे ऑक्सिजनसाठीही वेटिंग आहे. एकीकडे उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन मिळतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण वेळेत ऐनवेळी ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!