🕒 1 min read
मंगळवेढा – राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुरु आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे.
ही पोटनिवडणूक येत्या १७ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगरिथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, आज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीनिमित्ताने भगीरथ भारत नाना भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेतली. यावेळी सभास्थळी वरुणराजाने हजेरी लावली होती. वरुणराजासह मंगळवेढ्यातील जनतेचा उत्साह ही शिगेला पोहोचला होता. यावेळी जयंत पाटील यांनी भर पावसात सभा घेत विरोधकांवर हल्लाबोल केला.
आज पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणुकीनिमित्ताने भगीरथ भारत नाना भालके यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. सभास्थळी वरुणराजाने हजेरी लावली होती. वरुणराजासह मंगळवेढ्यातील जनतेचा उत्साह ही शिगेला पोहोचला होता. @BhagirathBhalke @NCPspeaks pic.twitter.com/qmvrK7gMtn
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 11, 2021
पाटील म्हणाले, मी जलसंपदा मंत्री झालो व आचारसंहिता लागण्याआधीच आपल्या तालुक्याला २ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला.इथल्या खासदारांनी गाव दत्तक घेतलं असं कळलं पण कधी इथे फिरकले नाही. भगीरथ भालके यांच्या नेतृत्वात पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना सुजलाम सुफलाम करण्याचा मानस आहे.
सत्ता गेल्यामुळे भाजपच्या लोकांना वेड लागलं आहे. पाण्याविना मासा तडफडतो तशी भाजपची परिस्थिती झाली आहे. या लोकांकडे दुर्लक्ष करून भालके यांना विजयी करा. भारत नानांचा हा मुलगा, आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने या मतदारसंघासाठी आधुनिक भगीरथ ठरेल! असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सातारा येथे भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा प्रचंड गाजली होती. १८ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर सभेचे आयोजन केले होते.त्यावेळी जोरदार वारे वाहत पावसाचे आगमन झाले.यानंतर देखील शरद पवारांनी माईक हाती घेतला आणि भर पावसात भाषण केले होते या सभेची आठवण आजच्या सभेने अनेकांना आली असणार हे नक्की.
महत्वाच्या बातम्या
- सचिन वाझेचा सहकारी रियाजुद्दीन काजीला NIA ने केली अटक
- जालना; अवैध देशी दारूचे शंभर बॉक्स सहित दोन संशयित ताब्यात
- पुण्यातून बिहारला गेलेल्या प्रवाशांना अर्धा तास रेल्वेतच कोंडले, १७ प्रवासी पॉझिटिव्ह
- रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सुरेश रैना आऊट ; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
- रेमडेसिवीरचे भाजपा कार्यालयात मोफत वाटप केल्यामुळे राष्ट्रवादीचा संताप होण्याचे कारण काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

