Share

टास्क फोर्सच्या बैठक संपली, ‘या’ विषयावर झाली बैठकीत चर्चा

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक सुरू होती. कोरोनाबाबतचा आढावा या बैठकीत घेतला गेला. लसीकरण आणि लॉकडॉऊनवर चर्चा बैठकीत करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’मध्ये मुंबईसह राज्यातील नामवंत डॉक्टरांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन हवा, असं मत टास्क फोर्सच्या बैठकीत मांडलं आहे.

तर दुसरीकडे कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष तात्याराव लहाने यांनी राज्यात १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन असावा, असं मत व्यक्त केले आहे. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी सवांद साधला. ‘ या बैठकीत ऑक्सिजन कसं वाढवता येईल, याबाबत चर्चा झाली. ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्ट करण्याबाबत चर्चा झाली. ही सुविधा थोडी खर्चिक आहे. पण याबाबत नक्की प्रयोग करु, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. साधारणपणे लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्टबाबत चर्चा झाली. हे प्लॅन्ट जिथे जिथे आहेत तिथे आपण सिलेंडर भरुन आणतो. त्या सिलेंडरला ट्यूबच्या माध्यमातून देतो. मात्र, आता ज्या पद्धतीने संख्या आहे त्यानुसार ही पद्धत बंद करावी, हा मुद्दा मांडला. लिक्वेड ऑक्सिजन प्लॅन्ट प्रत्येक जिल्ह्यात टाकायचा, असा निर्णय घेतला. हा प्लॅन्ट टाकल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांचा ऑक्सिजन साठवता येऊ शकतो. त्यामुळे दररोज पळापळ होणार नाही. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने बैठक घेणार आहेत. त्यावर तातडीने निर्णय होईल.’ असे टोपे यांनी सांगितले.

अंत्यसंस्कारच्या ठिकाणी गर्दी होते. ही गर्दी होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी विद्युत शवदाहिनी उभारण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. याबाबत बैठक होऊन निर्णय घेतला जाणार आहे. रेमडेसिव्हीरबाबत चर्चा झाली. हे इंजेक्शन आणखी दहा-पंधरा दिवस काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. कारण त्यानंतर आपल्याला चांगला साठा मिळेल. अनावश्यक वापरण्यावर कारवाई करण्याबाबतही चर्चा झाली. रेमडेसिव्हीर इंजेक्शन कलेक्टरच्या नियंत्रणाखाली खासगी हॉस्पिटलला देण्याचा निर्णय झाला आहे. तर सरकारी रुग्णालयाला थेट कंपनीकडून इंजेक्शन दिलं जाईल. त्यांची रेट कॅपिंगही केली जाईल. हे इंजेक्शन १४०० रुपयांवर दिले जाणार नाही. काल मी याबाबत आग्रही भूमिका घेतली. त्यानंतर आज सरकारने रेमडेसिव्हीर इंजेक्शनचं निर्यात केलं जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले.

तसेच बेड्सची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता या विषयावर टास्क फोर्सच्या बैठकीत तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चिंता व्यक्त केली. आरोग्य यंत्रणेवर असलेला ताणही कमी झाला पाहिजे, असं मत डॉक्टर्सनी व्यक्त केलं. राज्यात १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन असावा, असं मत डॉक्टर तात्याराव लहानेंनी व्यक्त केलं आहे. लॉकडाऊन लागण्याआधी जनतेला १ ते २ दिवसांचा वेळ मिळण्याची शक्यता आहे. नव्या स्ट्रेनबाबत उपाययोजनेची आवश्यकता असल्याचं मतंही डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केलंय. १४ दिवसांच्या कडक लॉकडाऊननेच कोरोनाची साखळी तुटेल, असं टास्क फोर्सच्या डॉक्टरांचं मत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!