Share

तहसीलदारासह महसूल सहायक लाचेच्या जाळ्यात

Published On: 

औरंगाबाद : वडिलोपार्जित जमिनीच्या सातबा-यावरील कुळ कायद्याप्रमाणे बेकायदेशीर शेरा कमी करुन व्यवहार करण्यासाठी शेतक-याकडून ७० हजाराची लाच स्विकारणा-या गंगापूरातील तहसीलदारासह महसूल सहायकाला एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई ९ एप्रिल रोजी करण्यात आली. तहसीलदार अविनाश महादेव शिंगटे आणि महसूल सहायक अशोक बाबुराव मरकड (५५) अशी लाचखोरांची नावे आहेत.

गंगापूर तालुक्यातील आपेगावातील शेतक-याची जमीन गट क्रमांक १९ मध्ये आहे. तिचा सातबा-यावरील बेकायदेशीर शेरा कमी करुन कुळ कायद्याप्रमाणे व्यवहार करण्यासाठी तहसीलदार शिंगटे व महसूल सहायक मरकड या दोघांनी एक लाख २५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, या विरोधात शेतक-याने एसीबीकडे तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने शहानिशा केली.

त्यावेळी या लाचेचा पहिला हप्ता म्हणून तहसीलदार शिंगटे आणि महसूल सहायक मरकड यांनी ७० हजारांची लाच स्विकारल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मारुती पंडीत, निरीक्षक विकास घनवट, पोलीस नाईक प्रकाश घुमरे, भूषण देसाई, शिपाई मिलींद इप्पर यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!