हैदराबाद: भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्याविरुद्ध हैदराबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानिया विद्यापीठाचे कुलसचिवांनी दिलेल्या तक्रारीवरून सूर्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैदराबादमध्ये असलेल्या खासदार तेजस्वी सूर्या यांनीही उस्मानिया विद्यापीठाला भेट दिली होती. त्यांच्या या भेटीवर विद्यापीठ प्रशासनानं आक्षेप घेतला आहे. हैदराबाद विद्यापाठात येण्यापूर्वी तेजस्वी सूर्या यांनी प्रशासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नाही. याप्रकरणी विद्यापीठाच्या कुलसचिवांनी सूर्या यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यावरून हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणाच्या पोलीस महानिरीक्षकांनी याची माहिती दिली.
तर सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधी मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी एनडीएमध्ये नसलेल्या सर्व पक्षांची डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक बोलावली आहे. इतर प्रादेशिक पक्षांना या बैठकीसाठी आमंत्रित करताना केसीआर यांनी काँग्रेसला मात्र या बैठकीपासून दुर ठेवले आहे. पक्षाच्या कोणत्याही नेत्याला त्यांनी आमंत्रित केलेले नाही. त्यामुळे भाजप बरोबर काँग्रेसपासूनही केसीआर यांनी दोन हात लांब रहाणे पसंत केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाण्यात पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर मनसेचा राडा; मनसे नेते ताब्यात
- काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी
- वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू : वडेट्टीवार
- ‘ते’ पुस्तक पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूचं आहे : नवाब मलिक
- मोदींनी दिएगो मॅराडोनाच्या निधनाबद्दल व्यक्त केले दुःख; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

