Share

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचं थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील परिसरात मनकर्णिका कुंडाचं उत्खनन सुरू असून, यामध्ये ४५७ पुरातन वस्तू सापडल्या आहेत. १९५७ मध्ये ही जागा सार्वजनिक बागेसाठी महापालिकेला देण्यात आली. २०२० मध्ये ती जागा देवस्थानच्या ताब्यात आली. या उत्खननात एक जिवंत काडतूस, १३५ दुर्मीळ नाणी, जुन्या मूर्ती-वीरगळ, अवघ्या सहा ते सात इंच लांबीची ‘मेड इन जर्मन’ रिव्हॉल्व्हर, प्राचीन मूर्ती, काचेच्या वस्तू असा पुरातन खजिना सापडला आहे.

त्याचबरोबर अंबाबाई मंदिर आणि परिसराचं थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचा निर्णय देवस्थान समितीनं घेतला आहे. अंबाबाई मंदिर परिसरात घाटी दरवाजा जवळच हे मनकर्णिका कुंड असून या उत्खननातून आणखी अनेक बाबी समोर येतील, असा विश्वास मंदिर अभ्यासकांना आहे. भाविकांना देखील हा खजिना पाहता येणार आहे.

हेमाडपंथी बांधकाम शैली असलेल्या या प्राचीन करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचं थ्रीडी स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र हे करत असताना मंदिराच्या मूळ रचनेला धक्का बसणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. यापूर्वी देखील अंबाबाई मंदिरातील भागात उत्खनन केले असता ऐतिहासिक माहिती समोर आली आहे. यावेळी देखील अशीच ऐतिहासिक वस्तू सापडली असल्याने या भागातील महत्त्व अधिक वाढले आहे. आता पुढे आणखी काय माहिती समोर येणार याकडे सद्य सर्वांच लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!