Share

महेंद्र सिंग धोनी इज बॅक ; नेट्समध्ये हॅलिकॉप्टर शॉट्सची फटकेबाजी

Published On: 

चेन्नई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२१ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर आयपीएलचे भारतात पुनरागमन होत आहे. ९ एप्रिलला पहिला सामना तर अंतिम सामना हा ३० मे रोजी होणार आहे. मात्र, यंदाही स्पर्धा विनाप्रेक्षकच पार पडणार आहे. परंतु अखेरच्या टप्प्यात करोनाचा संसर्ग कमी झाल्यास निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरला. इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वासाठी चेन्नई सुपर किंग्सच्या सराव सत्राची सुरूवात झाली. त्यात धोनीला सराव करताना पाहून चाहते सुखावले आहेत आणि त्यामुळेच सोशल मीडियावर #DhoniReturns हा ट्रेंड सुरू झाला आहे. कोरोना चाचणी पूर्ण केल्यानंतर धोनीनं मंगळवारी Indoor सराव केला.

चेन्नईच्या सराव सत्रासाठी धोनी चेन्नईत दाखल होताच सोशल मीडियावर चाहत्यांची चर्चा सुरू झाली होती. त्यात मंगळवारी धोनीचे नेट्समध्ये सराव करतानाचे फोटो व्हायरल झाले. धोनीनं चेन्नईत नव्यान स्थापन केलेल्या MS Dhoni Academyत हा सराव केला.

चेन्नई संघ : 

एमएस धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, नारायण जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सँटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, जोश हेझलवुड, आर साई किशोर, सॅम करन, रॉबिन उथप्पा, कृष्णप्पा गौतम, मोईन अली, चेतेश्वर पुजारा, के भागवथ वर्मा, सी हरी निशांथ, एम हरिशंकर रेड्डी.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!