औरंगाबाद : गुरुवारपासून टप्प्याटप्प्याने सलग आठ सुट्या आल्या आहेत. मात्र, आर्थिक वर्षातील महसुली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यातील सर्व आरटीओचे कामकाज सुरू ठेवावे, असे आदेश राज्य परिवहन उपायुक्त जितेंद्र पाटील यांनी जारी केले आहेत. त्यामुळे औरंगाबाद प्रादेशिक परिवहन विभागाचे कामकाज सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहे.
११ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. १३, १४, २०, २१ आणि २७ व २८ मार्च रोजी शनिवार आणि रविवार येतात. २९ मार्च रोजी धूलिवंदन आहे. मात्र, या सुट्यांच्या दिवशीही आरटीओचे कामकाज नियमित सुरू राहील. प्रादेशिक व उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी वाहन नोंदणीसाठी पुरेसे वाहन निरीक्षक नियुक्त करावेत, असे आदेश दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत रेकॉर्डब्रेक ५५० रुग्णांची नोंद, आत्तापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीनिमित्त भरणारी वाकीची यात्रा रद्द
- ट्रकखाली चिरडलेल्या मजुरांना न्याय द्या; समृद्धी महामार्गावर कामगारांचे आंदोलन
- महसूल बुडाल्या प्रकरणी तहसीलदार सोनींवर कारवाई होणार; आ. दानवेंच्या प्रश्नावर गृहमंत्र्यांचे उत्तर
- घाटीतील प्रथम ते चतुर्थ श्रेणीतील मंजूर पदे भरण्याची कार्यवाही लवकरच भरणार; देशमुख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

