Share

रोहितबरोबर धवन नाही तर ‘हा’ खेळाडू ओपनिंगला येणार?

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : अहमदाबाद येथे भारत-इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला एक डाव आणि २५ धावांनी हरवलं आहे. तर हा सामना जिंकून भारताने मालिका देखील ३-१ ने आपल्या खिशात घातली आहे. याबरोबरच भारताचे जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध इंग्लड मध्ये साउथम्प्टन होणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये धमाका करण्यासाठी तयार आहे. मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये धवनने स्वत:ला सिद्ध केलं आहे. आता इंग्लंडविरुद्ध धवन त्याचा ओपनिंग पार्टनर रोहित शर्मा सोबत इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज आहे. पण टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी धवनऐवजी राहुलने ओपनिंग करावी, असा सल्ला दिला आहे.

भारताने टी-20 सीरिजसाठी 19 खेळाडूंची निवड केली आहे. त्यामुळे प्रत्येक जागेसाठी टीमकडे दोन पर्याय आहेत. याचवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी-20 वर्ल्ड होणार आहे. त्याआधी विराट कोहली आणि रवी शास्त्री संतुलित टीम तयार करण्याचा प्रयत्न करतील.

‘ओपनिंगला रोहितसोबत केएल राहुलने खेळावं. मागच्या काही महिन्यांपासून भारतीय टीम केएल राहुलसोबतच गेली आहे आणि त्यानेही चांगली कामगिरी केली. राहुलने शिखर धवनसोबतही ओपनिंग केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितला दुखापत झालेली असताना राहुलच ओपनिंगला खेळला,’ असं लक्ष्मण म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!