जळगाव : “आगामी 15 वर्षात अखंड हिंदुस्तान होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल” असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आपण अहिंसेबद्दल बोलू, पण हातात दंडूका घेऊन बोलू. आपल्या मनात कसलाही द्वेष किंवा वैर नाही, असंही भागवत म्हणाले होते. यावेळी ते हरिद्वारमध्ये बोलत होते.
तसेच भागवत पुढे म्हणाले, “संत आणि ज्योतिषांच्या मते २० ते २५ वर्षात भारत पुन्हा एकदा अखंड भारत होईल. जर आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली तर १० ते १५ वर्षात अखंड भारत होईल.” यानंतर आता भागवत यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले कि, “अखंड भारत म्हणजे काय, तर आसेतु हिमाचलमध्ये नेपाळच्या हद्दीपासून पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश इथपासून सगळा अखंड भारत आहे. तर आता हा अखंड भारत १५ वर्षांमध्ये निर्माण करण्याची त्यांनी गोष्ट केली. चांगली गोष्ट आहे. त्यांच्याकडे देशाची सत्ता आहे. त्यामुळे सत्तेच्या जोरावर हा नवीन कार्यक्रम घ्यायचं त्यांचं उद्दिष्ट दिसतंय. १५ वर्षे काय फार नाहीयेत,” असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या :
- “कोर्ट आमच्यासाठी आहे, कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात” ; भाजप आमदार कुटे यांचं अजब वक्तव्य
- IPL 2022 वर पुन्हा कोरोनाचे सावट! दिल्ली संघात पॉसिटीव्ह केस मिळाल्याने खळबळ
- फडणवीसांच्या १४ ट्विट नंतर, हिंदू महासभेचे भाजपला १७ सवाल
- विराट कोहलीनंतर जो रूटचा मोठा निर्णय; अचानक सोडले टेस्टचे नेतृत्व!
- …जेव्हा कलेक्टर सरकारी शाळेतल्या वर्गात गुपचूप येऊन बसतात!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

