Share

नागराज मंजुळेचा ‘छत्रपती शिवाजी महाराजांवर’ सिनेमा येणार भेटीला; म्हणाले…

Published On: 

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपट सध्या हा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान दिग्दर्शक नागराज मंजुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला होता. मात्र कोरोनामुळे या चित्रपटाची निर्मिती करण्यात अडचणी येत आहेत, नागराज मंजुळे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबत माहिती दिली.

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख दोघे मिळून शिवरायांच्या आयुष्यावरील चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर नागराज मंजुळे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. ‘शिवत्रयी’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. तर या भव्य अशा चित्रपटाला संगीत अजय-अतुल देणार आहेत.

ते म्हणाले, “कोरोनामुळे आमचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. त्यात आम्हाला दोन वर्षे गमवावी लागली. ज्यामुळे आम्हाला नैसर्गिकरित्या या चित्रपटाचे काम करता आले नाही. या चित्रपटाबद्दल तुमच्याइतकाच मी देखील खूप उत्सुक आहे आणि याबाबत सर्व काही व्यवस्थित झाले की तुम्हाला याची माहिती देईन.

पुढे ते म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटाची निर्मिती करणे हे आव्हानात्मक आहे. हा चित्रपट ऐतिहासिक आहे. पण शेवटी आम्ही एका चित्रपटाची निर्मिती करत आहोत आणि चित्रपटाच्या निर्मितीचे नियम बदलत नाही. फक्त विषय बदलतात आणि अर्थातच चित्रपटाच्या स्वरुपात एक आव्हान समोर येतं. मी जेव्हा लहान होतो तेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट किती छान होईल, याचा विचार करायचो. मी त्यांच्यावर निर्मित झालेले दोन चित्रपट पाहिले आणि आता मला ते स्वत: बनवायचे आहेत. त्यामुळे माझ्यासाठी हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!