🕒 1 min read
नवी दिल्ली : एका पुरुषाने पत्नीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ‘ती महिला नसून पुरुष आहे’, असा दावा पुरुषाने केला आहे. खटला दाखल केलेल्या पुरूषाने मेडिकल रिपोर्ट सादर केल्याने खटल्यावर सुनावणी घेण्यास कोर्टाने सहमती दाखविली. यानंतर न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने पत्नीकडून उत्तर मागितले. मेडिकल अहवाल सदर करत, त्याच्या पत्नीला पुरुषाचे जननेंद्रिय आणि छिद्रहीन हायमेन आहे सिद्ध केले. इम्परफोरेट हायमेन हा एक जन्मजात विकार आहे ज्यामध्ये हायमेन योनीमार्गात पूर्णपणे अडथळा येतो.
कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत फौजदारी गुन्हा –
वरिष्ठ वकील एनके मोदी यांनी खंडपीठाला सांगितले की, “भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत फौजदारी गुन्हा घडला आहे कारण पत्नी ‘पुरुष’ आहे. ही निश्चितच फसवणूक आहे. कृपया तुम्ही मेडिकल रिपोर्ट पहा. हे काही जन्मजात विकाराचे प्रकरण नाही. तिला तिच्या गुप्तांगाबद्दल निश्चितपणे माहिती होते. पण तिने जाणीवपुर्वक फसवणूक केली असा युक्तिवाद वरिष्ठ वकील मोदी यांनी कोर्टात केला”.
मे २०१९ मध्ये, ग्वाल्हेरच्या दंडाधिकाऱ्यांनी पुरुषाने दाखल केलेल्या तक्रारीवरून पत्नीविरुद्ध फसवणुकीच्या आरोपाची दखल घेतली होती. त्याने आरोप केला की २०१६ मध्ये त्यांच्या लग्नानंतर, त्याला समजले त्यानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये न्यायालयात धाव घेतली.
यानंतर फसवणुकीच्या आरोपाची दखल घेत पत्नीला समन्स बजावणाऱ्या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जून २०२१ मधील निकालाविरुद्ध वरिष्ठ वकीलांनी युक्तिवाद केला आणि छिद्रहीन हायमेनमुळे पत्नीला स्त्री म्हणता येणार नाही. हे सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय पुरावे जमा आहेत असा युक्तिवाद केला.
तुमच्या अशिलाचे नेमके काय म्हणणे आहे? – न्यायालय
यावर न्यायालयाने मोदींना विचारले तुमच्या अशिलाचे नेमके काय म्हणणे आहे? यावर मोदी म्हणाले की, ‘ FIR वर योग्य ती कारवाई व्हावी आणि पत्नीने त्याला फसवल्याबद्दल त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल कायद्याने शिक्षा व्हावी अशी त्या व्यक्तीचे म्हणणे आहे’. यानंतर न्यायालयाने पुढे नमूद केले की, पत्नीने पुरुषाविरुद्ध IPC कलम ४९८ अ (क्रूरता) अंतर्गत फौजदारी खटलादेखील दाखल केला आहे. मोदी यांनी खंडपीठाला सांगितले की त्यांच्या अशिलाविरुद्धचा खटलादेखील प्रलंबित आहे. त्यानंतर खंडपीठाने पत्नी, तिचे वडील आणि मध्य प्रदेश पोलिसांना नोटीस बजावून ६ आठवड्यांत उत्तर मागवले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
