मुंबई : आज विधानसभेत शिंदे-फडणवीस यांच्या सरकारची बहुमत चाचणी होत असून, या सरकारने बहुमत सिद्ध करण्यात यश मिळवले आहे. विश्वासदर्शक ठरावात शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने १६४ मते मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. यानंतर अधिवेशनात बोलताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले.
भास्कर जाधव म्हणाले, आपण आज बाळासाहेब, दिघे, शिवसेनेचं नाव सांगताय, तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. एका बाजूला 40 शिलेदार उभे आहेत. दुसऱ्या बाजूला सामान्य शिवसैनिक छातीचा कोट करुन दुसऱ्या बाजूला उभा आहे. कोण कुणाला धारातीर्थी पाडणार आहे, याचा विचार करा. ही जबाबदारी आज आपल्यावर येऊन ठेपलेली आहे, असं देखील ते म्हणाले.
तसेच पुढे भास्कर जाधव म्हणाले कि, एकनाथ शिंदेजी हे तुम्हाला लढवत आहेत. रक्तपात शिवसेनेचा होईल. शिवसैनिक घायाळ होतील. २५ वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेना संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्यावर यांचं प्रेम नाही तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा आनंद आहे. पण शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावलं मागे घ्या. जर शिवसेना फुटू दिली नाहीत तर महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल, असंही भास्कर जाधव म्हणाले.
दरम्यान, सभागृहात बोलताना अजित पवार बोलताना म्हणाले कि, संपूर्ण सभागृहात या सगळ्या आमदारांमध्ये सगळ्यात नशीबवान कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहे. ते मुख्यमंत्री पण झाले, उपमुख्यमंत्री पण झाले आणि विरोधी पक्ष नेतेही झाले. सगळी महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली. आताही कुणाला वाटलंही नव्हतं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. फडणवीसांनी तीन चार वेळा सतत शिवसैनिक म्हणून उल्लेख केला. हे सारखं सारखं का सांगावं लागतंय. याच देखील तुम्हाला आत्मपरीक्षण करावं, असं देखील पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :


