🕒 1 min read
मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. उर्मिला मातोंडकर कायम वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्वतःचे मत मांडत असतात. आता उर्मिला मातोंडकर त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक ट्वीट केलं आहे. तसेच त्यांनी महिलांना ट्रोल करणाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत लिहिले की, “स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. तसेच काही ढोंगी लोकांना सांगू इच्छिते की, फेक अकाऊंटचा आधार घेत महिलांवर घाणेरड्या आणि अश्लिल कमेंट करण्यासाठी या महापुरुषाच्या फोटोचा वापर करु नका. तुमच्यासारख्या लोकांसाठी इतर ढोंगी स्वामींचे फोटो उपलब्ध आहेत.”
स्वामी विवेकानंद जी के पुण्यतिथि पर उन्हें विनम्र नमन ????????
और कुछ पाखंडियों को सख़्त चेतावनी-
अपने फेक अकाउंट से औरतों पर गंद और घटीया टिप्पणी करने के लिये क्रुपया इस महापुरुष के फ़ोटो का इस्तेमाल ना करें ।
आप जैसों के लिए कई फेक स्वामीयों के फ़ोटो उपलब्ध हैं । pic.twitter.com/x5DeIHPLHq— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) July 4, 2022
उर्मिला मातोंडकर यांचे ट्विट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या ट्विटवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. या ट्विटवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, “उर्मिलाजी तुम्ही असंच आपलं मत मांडत राहा.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
