🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि शिवसेना पक्षातील नेत्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची टोलेबाजी सुरू असलेली आपल्याला दिसून येतं असेल. अशातच शिवसेना पक्षाचे नेते गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य करत चॅलेंज दिलं आहे.
लोकांना वाटतं पुढार्यांची मजा आहे-
मंत्री होणे आमच्या पंजोबांच्याही नशिबात नव्हते. मात्र आम्ही मंत्री झालो. लोकांना वाटतं पुढार्यांची मजा आहे. आणि त्यातच आता 50 खोके सर्व ओके अशा नवीन घोषणा निघाल्या आहेत. परंतू ज्यांना असं वाटत असेल की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो. त्यांनी आठ दिवस आमच्याबरोबर राहून पहाव. तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर नवव्या दिवशी आम्ही मंत्रीपद सोडून देऊ, असं थेट चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युती गुलाबराव पाटील म्हणाले-
तसेच, आगामी काळातील निवडणूकांमध्ये शिवसेना पक्ष आणि संभाजी ब्रिगेड या पक्षांनी युती करून लढण्याचे ठरवले आहे. या पक्षांच्या युतीवरही गुलाबराव पाटील यांनी आपलं मत सांगितलं आहे. ते म्हणाले की, प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र यामुळे कोणाचा नफा किंवा नुकसान होईल हे सांगता येत नाही.
दूध का दूध पाणी का पाणी होईल-
शेवटी निवडून येतात यालाच महत्त्व असून आम्ही डोके निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे घोडा मैदान आता जास्त दूर नसून त्यासाठी सर्वच नेते आणि पक्ष प्रयत्न करत आहेत. चार सहा महिन्यात होणाऱ्या नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Gulabrao Patil | “स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही…”; गुलाबराव पाटील
- Asia Cup 2022 । भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
- Eknath Khadse | मला नाही वाटत लोकं खोक्यांमुळे निवडून येतात – एकनाथ खडसे
- Bachchu Kadu | आम्ही कोणाच्या सांगण्यावरुन बायकोला नाचवणाऱ्यांपैकी नाही – बच्चू कडू
- IND vs PAK | 147 धावांवर पाकिस्तान ऑलआऊट, भुवी आणि हार्दिकचा जोरदार धमाका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
