🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनिल कपूरचा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनिल कपूर यांनी मराठी भाषेत सवांद साधल्याने या व्हिडिओला बरीच पसंती मिळाली आहे. अनिल कपूर यांचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
अनिल कपूर AK vs AK चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आले. याच चित्रपटानिमित्त नुकताच अनिल कपूर यांनी सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. #AkVsAk हा हॅशटॅग वापरुन मला प्रश्न विचारा मी उत्तर देईन असं सांगत अनिल यांनी चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिलं. मात्र या सर्वांमध्ये त्यांचं एक उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे कारण एका चाहतीने गुजरातीमध्ये विचारलेल्या प्रश्नाला अनिल कपूर यांनी थेट मराठीत उत्तर दिलं आहे.
युट्यूबर असणाऱ्या अदिती रावल या तरुणीने अनिल कपूर यांच्या AK vs AK या चित्रपटाचं कौतुक केलं. यामध्ये अनिल कपूर यांनी खूपच छान अभिनय केला आहे. पडद्यावर वावरताना ते अभिनय करत आहेत असं वाटतं नाही, अशा शब्दांमध्ये अदितीने गुजराती आणि इंग्रजी भाषेत अनिल कपूर यांचं कौतुक केलं. तसेच तिने अनिल कपूर यांना मला तुम्हाला भेटून तुमची मुलाखत घेण्याची इच्छा आहे असंही म्हटलं. हा व्हिडीओ ट्विट करताना अदितीने तुम्ही एवढी ऊर्जा कुठून आणता असा प्रश्न अनिल कपूर यांना #AkVsAk हा हॅशटॅग वापरुन विचारला.
अनिल कपूर यांनी या ट्विटला उत्तर देताना व्हिडीओमध्ये अदितीने व्यक्त केलेल्या मुलाखत घेण्यासंदर्भातील इच्छेवर भाष्य केलं. मात्र हे उत्तर देताना गुजराती तसेच इंग्रजीमधून बोलणाऱ्या अदितीला मुंबईकर असणाऱ्या अनिल कपूर यांनी मराठीमधून उत्तर दिलं. “तुम्ही मला कदीही बोलवा मी कधीही येईन” असं उत्तर अनिल कपूर यांनी या ट्विटला दिलं.
Tumhi mala bolva , mi kadhi he yahen @aditiraval ???? https://t.co/SkpEpWAi5n
— Anil Kapoor (@AnilKapoor) December 30, 2020
अनिल कपूर यांचा या व्हिडिओला बरीच पसंती मिळत आहे. अनिल कपूरचं नाही तर मुंबई मध्ये राहणारे क्रिकेटर्स अभेनेते देखील मराठी भाषेत सवांद साधताना दिसतात. अनिल कपूर यांच्या आधी क्रिकेटर हार्दिक पंड्या याचा मराठी बोलतानाचा व्हिडीओ समोर आला होता त्याच्या या व्हिडिओला देखील बरीच पसंती मिळाली होती.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा महत्वाचा निर्णय; परीक्षा देण्यासाठीच्या नव्या मर्यादा केल्या जाहीर
- महेबूब शेख यांना नाहक बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र – राष्ट्रवादी
- सुप्रियाताई-रूपालीताई पिडीतेच्या बाजुने उभ्या राहणार की राष्ट्रवादीच्या आरोपी कार्यकर्त्यांच्या बाजुने ?
- सय्यद मुश्ताक अली टी-२० : पुणेकर राहुल त्रिपाठीच्या खांद्यावर महाराष्ट्राची धुरा
- भावा कसं… वजनात ! : ऋषभ पंतचं मॅथ्यू वेडला जबराट प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
