Share

सुप्रियाताई-रूपालीताई पिडीतेच्या बाजुने उभ्या राहणार की राष्ट्रवादीच्या आरोपी कार्यकर्त्यांच्या बाजुने ?

Published On: 

औरंगाबाद  : संभाजीनगर मध्ये तरूणीवर अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या अध्यक्षाला गुन्हा दाखल होताच तात्काळ अटक करण्याऐवजी पाठिशी घालणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी बुधवारी केली.

पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीच्या युवा अध्यक्षावर बलात्कारा सारखा गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट फिरत असुन पत्रकार परिषदेतही बसण्याचे धाडस करत आहे. हे केवळ गृहमंत्र्यांच्या आशीर्वादानेच होत आहे. ज्यावेळी बलात्काराचा गुन्हा दाखल होतो त्यावेळी पिडीतेवर कोणताही दबाव येऊ नये, पुराव्यामध्ये छेडछाड होऊ नये म्हणून आरोपीला तात्काळ अटक करून नंतर पुढची कारवाई केली जाते.
‘आरोपी असू तर शिक्षा भोगण्यास तयार आहोत’ असे विधान पत्रकार परिषद घेऊन केले जाते. जर तुमची बाजु बरोबर असेल तर गुन्हा दाखल होताच पोलिसांकडे सरेंडर होऊन तपासासाठी सहकार्य का केलं नाही? अशा पद्धतीने बाहेर मोकाट फिरून पिडीतेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोपी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याने खुद्द गृहमंत्र्यांनीच कायद्याला बगल दिली आहे.

राज्याचे, राज्यातील महिलांचे संरक्षण करणे हे गृहमंत्र्यांचे कर्तव्य आहे. गुन्हेगारांना संरक्षण देणे हे नव्हे. ‘शक्ती कायदा’ लागू करून जर गृहमंत्रीच आरोपीचे रक्षण करणार असेल तर कायद्याची अंमल बजावणी तरी कशी होणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सुप्रियाताई सुळे आणि रूपालीताई चाकणकर हे अशा परिस्थितीत पिडीतेच्या बाजुने उभ्या राहणार की राष्ट्रवादीच्या आरोपी कार्यकर्त्यांच्या बाजुने या आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या. गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालुन हा खटला शक्ती कायद्यानुसार फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पिडीतेला न्याय द्यावा अशी मागणी विक्रांत पाटील यांनी केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!