Share

महेबूब शेख यांना नाहक बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र – राष्ट्रवादी

Published On: 

मुंबई   – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर नाहक आरोप करण्यात आले असून स्वतः महेबूब शेख यांनी नार्को टेस्ट करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे मात्र भाजप राजकीय फायदा उठवण्यासाठी षडयंत्र करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

महेबूब शेख यांच्याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर लगेचच संबंधित अधिकाऱ्यांशी शेख यांनी संपर्क केला व आपण सर्वप्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहेत असे कळविले. काही तथ्य आढळल्यास मला शिक्षा करा अशीदेखील विनंती तपास  अधिकाऱ्यांकडे  केल्याचे महेश तपासे यांनी सांगितले.

भाजपाने राजकीय फायदा उठवण्यासाठी कालपासून महेबूब शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार गेल्या वर्षभरापासून कार्यरत असताना वेळोवेळी तिन्ही पक्षाच्या नेत्यांवर खोटेनाटे आरोप करून सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र काही विरोधी राजकीय नेतेमंडळी करत असल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारामध्ये तरुण कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे. युवक संघटनेच्या माध्यमातून तरुण पदाधिकाऱ्यांनी राज्यातील सर्व समाजामध्ये शिरकाव करून वेगवेगळ्या जातीधर्मातील लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित केले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पसंख्यांक समाजात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक नवीन नेतृत्व पुढे येत आहे हे काही विरोधी विचाराच्या पक्षाच्या मंडळींना बघवत नाही आणि त्यातून अशा खोट्या आरोपांच्या घटना समोर येत असाव्यात अंदाजही महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

तपास यंत्रणा आपला तपास करतच राहतील आणि त्यात काही आढळल्यास दोषींवर कारवाई करतीलच परंतु तपास होण्याच्या आधीच भाजपने महेबूब शेख यांना दोषी ठरवून स्वतःच्या राजकीय भाकऱ्या भाजण्याचा जो केविलवाणी प्रकार केला आहे त्याचा निषेधही महेश तपासे यांनी यावेळी केला.

या पत्रकार परिषदेत युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली. या पत्रकार परिषदेला युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे आणि मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!