पैठण : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करा व नियमांचे कडक पालन करावे. अधिकारी कर्मचऱ्यांनी चोवीस तास दक्ष राहावे. हलगर्जीपणा चाल ढकल खपवुन घेतला जाणार नाही. शासन पातळीवरून लागेल ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी कोरेनाबाबत आयोजित आढावा बैठकीत दिली.
पैठण तालुक्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात तातडीची महत्वपूर्ण आढावा व उपाययोजना संदर्भातील बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील लसींच्या तुटवड्या संदर्भात त्यांनी थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे, तसेच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या सोबत बैठकीतून संपर्क साधला.
यावेळी लस तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. दोन दिवसात लस उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिले. व्हेंटिलेटर , रूग्णवाहिका, व इतर आरोग्य विषयक सुविधां संदर्भात शासनाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. लसीकरण व कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी मंडळ अधकारी, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक आदीची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
या बैठकीत डॉ. भारत चव्हाण तसेच आडूळ येथील आरोग्य केंद्राच्या अनिवासी अधिकारी यांच्या बद्दल तक्रारीचा पाऊस पडला. या तक्रारीची भुमरे यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर कारवाई करण्यात बाबतीत त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या बैठकीला उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, मुख्याधिकारी सोमनाथ पाटील जाधवसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- Breaking : रशियानंतर नंतर अमेरिका, ब्रिटन, जपानच्या लसींच्या वापरालाही भारतात परवानगी
- मायच्यान कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका – धनंजय मुंडे
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार जनतेशी सवांद ,महाराष्ट्रात लॉकडाऊन होण्याची श्यक्यता
- शरद पवार यांच्यानंतर भाजप आमदाराने घरीच घेतली कोरोना लस, टीकेची झोड सुरू
- प्रकाश जावडेकर… तुम्ही महाराष्ट्रात राहता हेच आमचे दुर्देव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

