नवी दिल्ली : सध्या आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. तेथील प्रचारसभांना मोठी गर्दी होत आहे. पण यामुळे कोरोनाचा जास्त संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी कोरोना स्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सार्वजनिक कार्यक्रम तसंच प्रचारसभांवर बंदी आणण्याची मागणी सोनिया गांधींनी केली आहे.
I have had a detailed interaction with CMs of States ruled by the Congress Party & Ministers from alliance govts. I would like to highlight three issues that came up for your consideration & appropriate action: Congress President Smt. Sonia Gandhi to PM Modi pic.twitter.com/6YT1d5JTIa
— Congress (@INCIndia) April 12, 2021
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. देशात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने काही मुद्दे उपस्थित केलेत. काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यांच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर सोनिया गांधी यांनी हे पत्र पाठवलं आहे. बैठकीत त्यांनी राज्यातील परिस्थिती तसंच लसींची उपलब्धता, व्हेटिंलेटर आणि औषधांच्या सुविधेची माहिती घेतली होती. बैठकीत पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगडने आपल्याकडे लसींचा मर्यादित साठा असल्याचं सांगत केंद्राने तो पुरवठा वाढवावा अशी मागणी केली.
पत्रात पंतप्रधान मोदींकडे तीन मागण्या केल्या आहेत. यामध्ये योग्य पात्रता असलेल्या सर्व लसींना परवानगी द्या, कोरोनाशी संबंधित सर्व मेडिकल वस्तूंवरचा जीएसटी माफ करा तसेच पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. पण असं करण्याआधी सहा हजार रुपये गरिबांच्या खात्यात जमा करा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. सध्या वेंटीलेटर, ऑक्सीजन सिलेंडर यासह रेमडिसिविर आणि इतर औषधांवरही जीएसटी लागू होतो. पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. पण असं करण्याआधी सहा हजार रुपये गरिबांच्या खात्यात जमा करा अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- दलित भिकारी नाहीत तर शिकारी आहेत : रामदास आठवले
- कुंभमेळ्यातील गर्दीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले..
- मोठी बातमी : सचिन वाझे पाठोपाठ सहकारी रियाझुद्दीन काझीही निलंबित
- बोगस डॉक्टरने सुरु केले होते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुण्यातील धक्कादायक प्रकार
- उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संतप्त सवाल


