लातूर : तालुक्यातील रायवाडी येथील ग्रामस्थांनी उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यावरुन भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. स्वाती जाधव पाटील चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. तहसीलदारानी कोणाच्या आदेशावरुन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला असा सवाल स्वाती पाटील यांनी केला. फेसबुक लाईव्ह दरम्यान त्यांनी हा सवाल केला.
२०१६ रायवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असुन रायवाडी ग्रामपंचायतीने तसा प्रस्तावही दिलेला होता. गावात पुतळ्यांसाठी परवानगी लागते यासंबधात गावकऱ्यांना माहिती नव्हती. महत्वाचे म्हणजे या पुतळ्याला विरोध कोणाचाही नव्हता. मात्र, तरीही तहसीलदारांनी मोठा फौजफाटा आणून हा पुतळा काढला. त्यावेळी पुतळा काढू नये अशी विनंती उपस्थित ग्रामस्थांनी केली. परंतु तहसीलदारांना पुतळा काढण्याची खूप घाई होती, असे फेसबुक लाईव्ह दरम्यान स्वाती जाधव म्हणाल्या. ट्वेंटीवन शुगर्स कारखाना परिसरात काही बांधकामे अवैध आहेत. परंतु मंत्र्यांचा कारखाना असल्याने अधिकारी तिकडे जातही नाहीत. गावकऱ्यांनी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांना डोळ्यात खूपतो.
पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील या गावात १ हजार मतदानापैकी ९३५ मते अमित देशमुख यांना पडलेली होती. परंतु त्यांनी गावकऱ्यांचा फोनही उचलला नाही. गावकऱ्यांचे म्हणणे ऐकले असते तर पुतळा जागेवरून हटला नसता, असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण काढत त्या म्हणाल्या की विलासराव देशमुख हे सामान्य नागरिकांचे फोन उचलत असत, त्यांच्या समस्या ऐकून घेत असत. परंतु त्यांचा वारसा सांगणारे पालकमंत्री मात्र नागरिकांचे फोन उचलत नसल्याचे सौ.स्वाती जाधव म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- हुश्श! शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला; महावितरणने वाढवून दिली मुदत
- राम मंदिर उभारणीसाठी जालना जिल्ह्यातून १३ कोटी रुपये निधी संकलीत
- ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा देशातील अभिनव उपक्रम; अभिभाषणात राज्यपालांनी केले राज्य सरकारचे कौतुक
- वाढदिवसादिवशी ‘हा’ क्रिकेटर हॉस्पिटलमध्ये ; कोरोना झाल्यामुळे करावं लागलं दाखल
- राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे अधिवेशन सुरु होण्याआधी शरद पवारांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
