Share

राम मंदिर उभारणीसाठी जालना जिल्ह्यातून १३ कोटी रुपये निधी संकलीत

Published On: 

जालना : अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माणासाठी जालन्यातून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्यात आला आहे. जिल्ह्यात ९६२ गावे आणि वाड्यावस्त्यांवर जाऊन रामभक्तीनी महिनाभरत १३ कोटी ३८ लाख रुपये निधी संकलीत केला आहे. श्री राम जन्मभूमी मंदिर समर्पण निधी संकलन समितीचे स्थानिक उपाध्यक्ष जयमंगल जाधव यांनी दिली आहे.

अयोध्येतील श्री राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून निधी संकलीत करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालन्यात देखील समर्पण निधी समितीची स्थापना करण्यात आली होती. ज्येष्ठ उद्योजक घनशाम गोलय हे या समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा मार्गदशनाखाली जिल्ह्यातील जवळपास सर्व गावांमध्ये रामभक्तांनी भेटी देऊन राम मंदिर उभारणीसाठी देणगी स्विकारल्याचे, पत्रकार परिषदेत जयमंगल जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, जालन्यातील व्यापारी, उद्योजकांसह सामान्य नागरिकांनी आपापल्या पद्धतीने निधी देऊन राम मंदिर निर्माणासाठी हात भार लावला. तसेच निधी संकलनादरम्यान विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!