Share

कर चुकवणाऱ्यांविरुद्ध जीएसटी अधिकाऱ्यांची मोहीम, 25 लाखांचा दंड वसूल

Published On: 

जालना : औद्योगिक वसाहतीमध्ये स्टील उत्पादन करणारे खुप कारखाने आहेत. या मुख्य उद्योगासह खाद्यतेलाचे, अन्यदेखील कारखाने आहेत. मात्र, इथे मोठ्या प्रमाणात राज्य शासनाचा कर (जीएसटी) चुकवला जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जालना -औरंगाबाद महामार्गावर आपला मुक्काम ठोकला आहे. वाहनांची कसून चौकशी सुरू आहे.

राज्यकर सहआयुक्त कार्यालयाची कारवाई
औरंगाबाद विभागात येणाऱ्या राज्यकर सहआयुक्त कार्यालयाच्यावतीने ही कारवाई सुरू आहे. जालन्यापासून काही अंतरावरील पथकर नाक्याच्या बाजूलाच या विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुक्काम ठोकला आहे. नाक्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. २९ तारखेपासून या तपासणीला सुरुवात झाली. आत्तापर्यंत १० हजार वाहनांची तपासणी केली आहे.

पंचवीस लाखांचा दंड वसूल
शासनाच्या जीएसटी नियमानुसार ज्याने माल विकला आहे. किंवा ज्याने माल खरेदी केला, त्याने ई-वे बील फाडल्यानंतर संबंधित वाहनातून त्या मुदतीत माल नियोजित ठिकाणी पोहोचवणे अपेक्षित असते. अनेक वेळा एक बील फाडल्यानंतर काही वाहने त्याच बिलाच्या आधारावर दोन चकरा मारून कर उडवण्याचा प्रयत्न करतात. तर अनेक व्यापारी हे बील फाडतच नाहीत. त्यामुळे लाखो रुपयांचा कर बुडवत असल्याच्या तक्रारी या विभागाला प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने या विभागाने इथे तंबू ठोकून वाहनांची तपासणी सुरू केली. सुमारे ३५ वाहनांकडून २५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

दहा अधिकारी कार्यरत
पथकर नाक्याच्या बाजूलाच तंबू टाकून तिथे आरामाची आणि सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था केली आहे. दोन पाळ्यांमध्ये दहा – दहा अधिकारी इथे लक्ष ठेवतात. नाक्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची डोळ्यात तेल टाकून तपासणी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!