मुंबई : काही दिवसांपूर्वी वापरापेक्षा जास्त वीज बिल आकारले जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. दरम्यान शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी व थकबाकी वसुलीसाठी आता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ जाहीर केलेली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना व वीज बिल धारकांना दिलासा मिळणार आहे.
विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ ज्या ग्राहकांची वीज बिले थकलेली आहे, असे ग्राहक घेऊ शकतात. यामध्ये ग्राहक वीज बिल हप्त्यांमध्ये भरू शकतात. त्याचबरोबर ज्या ग्राहकांची वीज खंडित करण्यात आली आहे, त्या ग्राहकांसाठी सुद्धा ही योजना फायदेशीर आहे. या माध्यमातून आता फेरजोडणीचा देखील लाभ घेता येणार आहे.
योजनेचे फायदे-
राज्यभरात जवळपास ३२ लाख ग्राहकांना परत वीज मिळणार आहे. औद्योगिक आणि व्यवसायिक आस्थापना परत सुरू होणार. या योजनेचा लाभ रोजगार निर्मितीसाठी पण होणार आहे. थकबाकीत विजबिलाची वसुली होऊन महावितरणाची परिस्थिती सुधारणार आहे.
महत्वाच्या बातम्या –


