बीड: राज्यमंत्री धनंजय मुंडे हे आज प्रत्रकारांशी बोलत होते. दरम्यान त्यांना निलेश राणेंबद्दल विचारले असता त्यांनी एकाच ओळीत पण अतिशय खरमरीत उत्तर दिले. निलेश राणेंनी शरद पवार यांच्यावर दाऊदचा माणूस म्हणून शंका व्यक्त केली होती, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता त्यावर, यावेळी कोण निलेश राणे? अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
काय म्हणाले होते निलेश राणे
भाजप नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. “पवार साहेबच दाऊदचा माणूस असू शकतात” असं ट्विट त्यांनी २ दिवसांपूर्वी केले होते. त्यांचं हे ट्विट जोरदार व्हायरलही झाले होते. याच बरोबर त्यांनी आणखी एक ट्विट केले होते. “पवार साहेब नावाने मोठे झाले असले तरी मनानी मोठे नाही. त्यांनी वर्षानुवर्ष केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय, त्यांनी पोसलेले कीडे आज महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी धुडगूस घालत आहेत, पवार साहेबचं पाकिस्तानचे एजंट तर नाही ना असा संशय यायला लागला आहे”, अशी जळजळीत टीका निलेश राणे यांनी पवारांवर केली होती.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

