बीड: पंकजा मुंडेंनी बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांसंबंधी गृहमंत्री, गृह राज्यमंत्री आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांना पत्र लिहले आहे. या पात्रात त्यांनी बीड मधील अनेक प्रश्नांवर भाष्य केले आहे. दरम्यान याच संदर्भात पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला. यावेळी मुंडे म्हणाले, ज्याला कुणाला एखादा विषय मांडायचा असतो त्यांनी मांडावा. मात्र सध्या बीड जिल्हा असा, बीड जिल्हा तसा, असे चालू आहे. असे बोलून तुम्ही बीड जिल्ह्याला बदनाम करू नका, असा टोला त्यांनी पंकजा मुंडेंना लगावला आहे.
समजा मी धनंजय मुंडे म्हणून काम करत नसेल तर धनंजय मुंडेंला वाट्टेल तसं बदनाम करा. मात्र बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. बीड जिल्हा बिहार झालाय, बीड जिल्ह्याला मागास म्हणून माझ्या जिल्ह्याची बदनामी करू नका, अशी परखड टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

