परभणी : कृषी उत्पादन आणि प्रक्रिया आणि मुल्यवर्धनाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत भारतात अत्यंत कमी आहे. कृषी उत्पादन प्रक्रियेच्या अभावी अन्नधान्ये, भाजीपाला व फळे यांची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. कृषीमालेचे नुकसान टाळण्यासाठी छोटे छोटे कृषी उद्योग सुरु होणे आवश्यक आहे. मराठवाडयात कृषी प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी मत व्यक्त केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागातर्फे भारतीय कृषी अनुसंधान परिषद अनुदानित कौशल्य विकास योजने अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थीकरिता शेतमाल प्रक्रिया लघु उद्योग याविषयावर 23 ते 26 मार्च दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. 23 मार्च रोजी प्रशिक्षणाचे उद्घाटनाप्रसंगी डॉ. ढवण बोलत होते. या कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, मुख्य आयोजक सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले म्हणाले की, अन्नधान्य, डाळ आणि अन्य शेतमाल यांचे प्रक्रिया करून आवश्यक पॅकेजींग केल्यास शेतकर्यांना निश्चितपणे जास्त आर्थिक मोबदला देखील मिळतो. तर संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल्या आहारातील चिंच, अद्रक, लसून यावर प्रक्रिया करून त्यावर आधारित छोटे छोटे उद्योग सुरु करण्यास मराठवाडयामध्ये खूप वाव असल्याचे सांगितले. तर सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके म्हणाले की, कृषी प्रक्रिया उद्योग याचा देशाच्या विकासातील सहभाग वाढत आहे. सध्या भारतात 25 लाख असंघटीत प्रक्रिया उद्योग आहेत. ज्यामुळे अनेक सुशिक्षित व कुशल कामगारांना रोजगार निर्मितीची मोठी संधी देखील उपलब्ध होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रणबीर-आलियाच्या संगीतमध्ये ‘या’ गाण्यावर डान्स करणार आई नीतू कपूर ; व्हिडिओ व्हायरल
- …आणि ‘या’ माकडांना वाटतं की, ते बंगालमध्ये जिंकतील ?
- अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डच्या वडिलांचे निधन
- ‘मी पुन्हा येऊ का?’ ‘या’ कॉमेडीयने साधला फडणवीसांवर निशाणा
- ‘त्यांनी साडी नेसण्याऐवजी बर्मुडा घालावा’,भाजपा नेत्याची ममतांवर वादग्रस्त टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

