लातूर: औसा विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कामासंदर्भात १ कोटी ९ लाख रुपयांच्या विकास कामांना मुलभूत सुविधा अंतर्गत मंजूरी मिळाली असून यामध्ये मतदारसंघातील अकरा कामांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे औसा मतदारसंघातील विकासकामांना गती मिळणार असून अनेक रखडलेले काम लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे.
राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे ३ कोटी रुपयांच्या विकास कामासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी शिफारस केली होती. यापैकी १ कोटी ९ लाखांच्या कामांना मंजुरी मिळाली असून यामध्ये प्रामुख्याने आपचुंदा केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांचे बांधकामासाठी १० लाख, कासारसिरसी येथील राज्य मार्ग रस्ता दुभाजक पथदिवे बसवण्यासाठी १० लाख, लाडवाडी अंतर्गत रस्ते कामासाठी १५ लाख रुपये, असे एकूण अकरा कामांचा यात समावेश आहे.
औसा मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भात आ. अभिमन्यू पवार हे सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होते. तसेच या विकासकामांसाठी निधी मंजूर करून उपलब्ध करून दिला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आ. पवार यांनी विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीची शिफारस केली होती. एकीकडे कोरोनाचे संकट त्यामुळे येथील अनेक कामं रखडले आहेत, मात्र उपलब्ध निधीतून विकासकामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- संतापजनक : नखांसाठी शिकाऱ्यांनी गरोदर वाघिणीला जाळलं
- ‘गांधी भवन’ लवकरच होणार कोविड सेंटर! शहर काँग्रेसचा ‘सकारात्मक’ पुढाकार
- योगींच्या उत्तर प्रदेशात मरणानंतरही हालच ; मृतदेह वेटिंग लिस्टवर, स्मशानभूमीत जागाच मिळेना !
- ना ऑक्सिजन ना व्हेंटिलेटर.. लातूरची परिस्थिती चिंताजनक
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

