🕒 1 min read
सिंधुदुर्ग : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
दरम्यान, भाजपला आणि आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला धक्का बसला आहे. कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतचा पहिला निकाल हाती आला आहे. भिरवंडे ग्रामपंचायतीत 7 पैकी 4 जागा बिनविरोध निवडून आणण्यात शिवसेनेला यश आले आहे. त्याशिवाय कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेली आहे. तालुक्यातील भिरवंडे व गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे. कणकवली हा नितेश राणेंचा मतदारसंघ असून राणेंसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- बॅटिंगदरम्यान ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मला डिवचत होते, शार्दूल ठाकूर म्हणाला….
- राज ठाकरे म्हणाले ताकदीने लढा, पण मनसेचे इंजिन सुरूच झालं नाही
- बिहारमध्ये दारूण पराभवाचा सामना करणारी शिवसेना आता पश्चिम बंगालची निवडणूक लढवणार
- संभाजीनगरवर चर्चा होईल परंतु निर्णय झालेला आहे, संजय राऊतांचा कॉंग्रेसला अप्रत्यक्ष दम !
- थाटामाटात लोकार्पण केलेल्या प्रकल्पातील ५२ टक्के निधीची पालिकेला प्रतीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
