🕒 1 min read
मुंबई:- राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार केलेल्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) निकालात मात्र फारसे यश मिळताना दिसत नाही. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पाच ग्रामपंचायतींमध्ये मनसे आघाडीवर होती. मात्र, तेव्हापासून मनसेचे इंजिन पुढे सरकरलेलेच नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका ताकदीने लढवण्याचा मनसेचा निर्धार फुसका बार ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महत्वाच्या बातम्या
- स्मिथच्या कृत्यानंतर आता रोहितचे कृत्य आले चर्चत
- शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलचा दारूण पराभव
- पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ
- कसं जनता म्हणेल तसं! विखे पाटलांच्या २० वर्षाच्या सत्तेला सुरुंग
- ‘या’ तारखेस चित्रपटगृहात रिलीज होणार शाहिदचा ‘जर्शी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
