🕒 1 min read
मुंबई : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.
यावरून आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एक पत्रक काढत शिवसेनेला चांगलच फैलावर घेतल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही, औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे. अस बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
तर, राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यात कडे जनता करमणूक म्हणून बघते आहे. असं म्हणत थोरातांनी भाजप-शिवसेनाला चांगलच फैलावर घेतले आहे.
यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब थोरात यांना प्रत्युत्तर दिले आहे. औरंगजेबाच्या प्रेमात कोणीही पडू नये, महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरच प्रेम करावं असं मला वाटतं, औरंगजेब हा क्रूर शासक होता, तो धर्मांध होता, त्याला परधर्माबद्दल अजिबात प्रेम नव्हतं, अशा राजाच्या नावासाठी राज्यात आणि देशात कोणीही आग्रही असू नये, संभाजीनगर हे नाव शिवसेनेने दिलेले आहे, त्यावर कोणी आक्षेप घेऊ नये, औरंगजेबाने हिंदूंची धर्मांतर, छळ केला ही माहिती औरंगजेबावर प्रेम करणाऱ्यांनी मिळावी यासाठी लेख लिहिला होता असं त्यांनी सांगितले.
तर, मतांचे राजकारण नाही, हा चांगला आणि वाईट असा विषय आहे, मतांचा नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक असले तरी त्यांच्या इतका सेक्युलर राजा दुसरा कोणीही झाला नाही. औरंगजेब, बाबर ही आमची प्रतिकं होऊ शकत नाही. विरोध करणाऱ्यांनी आधी औरंगजेब समजून घेतला पाहिजे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरचा निर्णय स्पष्ट केला आहे, हा लोकांच्या भावनेचा विषय आहे, यावर चर्चा होईल परंतु निर्णय झालेला आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे दम दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नाला झाली 20 वर्षं, बायको ट्विंकलसाठी लिहली भावुक पोस्ट
- कसं जनता म्हणेल तसं! विखे पाटलांच्या २० वर्षाच्या सत्तेला सुरुंग
- औरंगाबाद विमानतळास गौतम बुद्ध विमानतळ असे नाव द्या; सचिन खरात यांची मागणी
- वनपट्टे देतांना गरीबांची फसवणूक करुन गैरप्रकार केला तर खबरदार…
- ‘या’ तारखेस चित्रपटगृहात रिलीज होणार शाहिदचा ‘जर्शी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
