🕒 1 min read
ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात चौथ्या कसोटीतील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. मालिका बरोबरीत असल्याने या सामन्यात आणखी रंगत वाढली आहे.
अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हे चिडखोर स्वभावचे असतात. सामन्यात पिछाडीवर पडल्यास किंवा एखादा फलंदाज डोकेदुखी ठरत असल्यास त्या खेळाडूला डिवचण्याचा प्रयत्न करतात. याच चिडखोर स्वभावाचा प्रचिती आली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मला डिवचत होते, अशी माहिती टीम इंडियाच्या शार्दुल ठाकूरने दिली आहे.
“ऑस्ट्रेलियाचे खेळाडू माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मी दोनदा त्यांना एका शब्दातच उत्तर दिलं. त्यांनी मला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र मी या प्रकाराकडे दुर्लक्ष करत फलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं”, असं शार्दूल म्हणाला. शार्दुल तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाल्यानंतर बोलत होता. यावेळेस त्याने घडल्या प्रकाराची माहिती दिली.
“टीम इंडिया 6 विकेट्स गमावल्या होत्या. यामुळे आमचं लक्ष हे खेळपट्टीवर टिकून राहण्याचं होत. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज हे थकल्याचं आम्हाला जाणवलं. त्यामुळे मैदानात आणखी वेळ खेळून या गोलंदाजांना आणखी थकवल्यास आपण या सामन्यातील आव्हान कायम राखू शकू”, अशी आमची योजना असल्याची माहिती शार्दुलने दिली.
“आम्ही फंलदाजीसाठी मैदानात आलो तेव्हा कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करत होतो. आम्हा दोघांमध्ये भागीदारी होऊ लागली. त्यानुसार आम्ही फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. गाबाच्या मैदानात चेंडू उसळतो. त्यामुळे गोलंदाजाच्या वाईट चेंडूवर फटके लावायच ठरवलं होतं”, असंही शार्दुलने नमूद केलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते-पाटील
- चंद्रकांत पाटील यांना धक्का; मूळ गावात शिवसेनेचा दणदणीत विजय
- नामांतर लढ्यातील योद्द्यांचा आठवलेंच्या हस्ते होणार सत्कार
- ‘बर्ड फ्लू’ची बाधा माणसांना होत नाही – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
- अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नाला झाली 20 वर्षं, बायको ट्विंकलसाठी लिहली भावुक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
