🕒 1 min read
औरंगाबाद : अभुतपूर्व कचराकोंडीनंतर राज्य सरकारने महापालिकेच्या १४८ कोटी रूपयांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या डीपीआरला (सविस्तर प्रकल्प अहवाल) मंजुरी दिली. यापैकी मागील अडीच वर्षांत पालिकेला ७२ कोटी म्हणजे ४८ टक्केच निधी प्राप्त झाला आहे. ५२ टक्के म्हणजे ७६ कोटींच्या निधीची अद्यापही प्रतीक्षा आहे. आजवर प्राप्त निधीतून पालिकेने चिकलठाणा, पडेगाव आणि कांचनवाडी कचरा प्रक्रिया प्रकल्पांची कामे केली असून आता हे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. मात्र हर्सूलचा प्रकल्प आणि नारेगाव डेपो नष्ट करण्याचे काम अद्यापही बाकी आहे.
मागील अडीच वर्षांत चिकलठाणा येथील १५० मेट्रिक टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प वर्षभरापूर्वीच सुरू झाला. मात्र पडेगाव, कांचनवाडी, हर्सूल या प्रकल्पांची कामे या ना त्या कारणाने रेंगाळतच राहिली. यापैकी आता पडेगावचा १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प आणि कांचनवाडी येथे ३० मेट्रिक टन ओल्या कचर्यापासून बायोगॅस निर्मिती हे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.
शनिवारी पालकमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या तिनही प्रकल्पांचे लोकार्पण झाले. तथापि, हर्सूल प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. तसेच नारेगाव येथील २० लाख मेट्रिक टन कचर्याच्या डोंगर देखील पालिकेला नष्ट करावयाचा आहे. गारबेज अर्थातच जुन्या बांधकामातील टाकाऊ साहित्यावर प्रक्रिया करण्याचाही प्रकल्प या डीपीआरमध्ये नियोजित आहे. या तिन्ही कामांसाठी पालिकेला उर्वरीत निधीची प्रतीक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते-पाटील
- चंद्रकांत पाटील यांना धक्का; मूळ गावात शिवसेनेचा दणदणीत विजय
- नामांतर लढ्यातील योद्द्यांचा आठवलेंच्या हस्ते होणार सत्कार
- ‘बर्ड फ्लू’ची बाधा माणसांना होत नाही – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
- पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरे सत्राचा खेळ थांबवला; ऑस्ट्रेलियाकडे २७६ धावांची आघाडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
