Share

बिहारमध्ये दारूण पराभवाचा सामना करणारी शिवसेना आता पश्चिम बंगालची निवडणूक लढवणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बिहारच्या निवडणूकीत नोटापेक्षाही कमी मते मिळविण्याचा विक्रम करणाऱ्या शिवसेनेने पश्चिम बंगालच्या निवडणूकी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसमोर मैदानात उतरत आव्हान निर्माण करायचे ठरविले आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय रणधुमाळी सुरू आहे. बंगालच्या या रणधुमाळीत आता शिवसेनाही ‘जय बांगला’ म्हणत शड्डू ठोकणार आहे. शिवसेना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केली.

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. आम्ही लवकरच कोलकात्यात दाखल होऊ. जय हिंद, जय बांगला’ असे ट्विट करत संजय राऊत यांनी बंगाल निवडणुकांची घोषणा केली.

शिवसेना बंगालच्या रणधुमाळीत उतरणार असली, तरी नेमक्या किती ठिकाणी उमेदवार उतरवणार, उद्धव ठाकरे प्रचारासाठी बंगालमध्ये जाणार का, याबाबत कोणताही तपशील संजय राऊत यांनी दिलेला नाही.

विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुका भाजप, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेसबरोबरच ओवेसींची पार्टी AIMIM सुद्धा लढणार आहे. संजय राऊतांनीही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालंय. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत 100 जागा लढवणार असल्याचीही माहिती समोर आली होती.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष वेगवेगळी धोरणे आखत असून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व लोकांची मने जिंकण्यासाठी रथयात्रा काढणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!