Share

विधानसभा निवडीबाबत आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा; राज्यपाल म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यपालांनी दोनदा पत्रे पाठवले होते. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या 3 बड्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे.

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेऊन त्यांना विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सादर केला आहे. यावर कायदेशीर बाबी तपासून उद्या सांगतो, असं आश्वासन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल उद्या काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या 27 डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे. तर, 28 डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.

या संदर्भातील माहिती देण्यासाठी आज राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज राजभवनावर राज्यपालांच्या भेटीसाठी आले होते. या तिन्ही नेत्यांनी यावेळी भगतसिंग कोश्यारी यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली आहे. त्यानंतर त्यांना सरकारचा प्रस्तावही सादर केला आहे. या भेटीनंतर एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधून चर्चेची माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!