🕒 1 min read
जळगाव: राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर (Rohini Khadse-Khewalkar))यांच्या वाहनावर काल (२७ डिसेंबर) अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी पक्षाने हल्याला जशास तसे उत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. तर आता स्वतः रोहिणी खडसे यांनीच ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना सवाल केला आहे.
‘मुख्यमंत्री महोदय, संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना? असा सवाल रोहिणी खडसे यांनी ट्वीट करत केला आहे. दरम्यान रोहिणी खडसे या सुखरूप असून हल्लेखोर फरार झाले आहेत. तसेच ते एकूण पाच जण असून त्यांच्याकडे लोखंडी रॉडसह शस्त्रे असल्याचीही माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
https://twitter.com/Rohini_khadse/status/1475664229583650818
या घटनेवरून राष्ट्रवादीचे मेहबूब शेख, रुपाली पाटील ठोंबरे यांनी निषेध केला असून हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या घटनेचा मुद्दा विधानसभेत मांडणार असल्याचे म्हटले आहे. आता या घटनेवरूनच रोहिणी खडसे यांनी महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून थेट मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई व्हावी- रुपाली ठोंबरे पाटील
- रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल; राष्ट्र्वादीचा इशारा
- रोहिणी खडसे हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत मांडणार- चंद्रकांत पाटील
- ‘…यामुळे सापसुद्धा चावतो ही आधीच माहीत असलेली गोष्ट नव्याने समजली’
- चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन शरद पवारांनी घेतला खरपूस समाचार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

