🕒 1 min read
Udayanraje Bhosale | रायगड : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे वादात अडकले आहे. महाविकास आघाडी, भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि राज्यातील सत्ताधारी भाजपचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढत्या दबावामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बॅकफूटवर असल्याचे दिसत आहे. भाजपवर देखील जोरदार टीका होत आहे. आज रायगड किल्ल्यावर जाऊन उदयनराजे यांनी राज्यपालांच्या हकालपट्टीसाठी आक्रमक पवित्रा घेतला.
उदयनराजे म्हणाले, “राज्यपालांची उचलबांगडी जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत शांत बसणार नाही. इथं असते तर राज्यपालांना टकमक टोकावरून टाकून दिले असते.” यानंतर उदयनराजे यांनी विषय सांभळण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “राज्यपालांचा तोल गेला असता. त्यांना मी हात लावला नसता, त्यांना हात लावून माझा कमीपणा झाला असता.”
“भारत महासत्ता होणे गरजेचे आहे. शिवसन्मानाचा निर्धार करण्याची वेळ आपल्यावर आली आहे. या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत, वैयक्तिक स्वार्थासाठी लोकांच्या विचारात तुम्ही बदल केला. विकृत लोकांच्या हातात देशा गेला आहे. हे असंच राहील तर आधी देशाचे तीन तुकडे झाले. आता ३३ तुकडे व्हायला वेळा लागणार नाही, शिवाजी महाराजांचा आपण सन्मान करायला हवा हे बोलावं लागतं. ही बोलायची गरज आहे? ते अंतकरणातून आलं पाहिजे,” असे उदयनराजे म्हणाले.
उदयनराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले, “राज्यपालांना पदावरुन हटवावे, अशी मागणी कायम असणार आहे. यासाठी आम्ही आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत. राष्ट्रपती देशाचे सर्वोच्च पद असते, तसे राज्यपाल राज्याचे सर्वोच्च पद आहे. त्या पदावरती त्यांना राहण्याचा अधिकार नाही.”
महत्वाच्या बातम्या :
- Udayanraje Bhosale | राज्यपालांच्या वक्तव्यावर उदयनराजे आक्रमक! म्हणाले, “लाजा वाटल्या पाहिजेत, वैयक्तिक स्वार्थासाठी…”
- Mercedes SUV Launch | मर्सिडीजची नवीन एसयुव्ही लाँच, करेल ‘या’ कारसोबत स्पर्धा
- Sanjay Raut | …तर तुमच्या शिव्यांचं महाराष्ट्र कौतुक करेल, पण… ; संजय राऊतांचे गायकवाडांना चॅलेंज
- Lip Care Tips | हिवाळ्यामध्ये ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या ओठांची काळजी
- MNS | “मातोश्रीचा ‘सोंगाड्या’ सकाळी भगवा, दुपारी हिरवा आणि रात्री सप्तरंगात, तरीही बाईला…” ; मनसेची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
