Share

रोहिणी खडसे हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत मांडणार- चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादीच्या नेत्या आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर (Rohini Khadse-Khewalkar))यांच्या वाहनावर काल (२७ डिसेंबर) अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. आता या घटनेचा मुद्दा विधानसभेत मांडणार असल्याचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Muktainagar MLA Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे.

रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध करतो, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले. तसेच रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी शासनदरबारी करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. सदरील प्रकरण विधानसभेत मांडणार असून या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचे मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान रोहिणी खडसे या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना एमएच १९ सीसी-१९१९ या क्रमांकाच्या त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि चालक होता. आता या घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केल्याचे जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!