Share

Mercedes SUV Launch | मर्सिडीजची नवीन एसयुव्ही लाँच, करेल ‘या’ कारसोबत स्पर्धा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: लक्झरी वाहक उत्पादक कंपनी मर्सिडीज (Mercedes) ने भारतामध्ये नुकत्याच आपल्या दोन कार लाँच केल्या आहेत. यामध्ये GLB आणि EBQ यांचा समावेश आहे. EBQ ही एक इलेक्ट्रिक कार आहे. ज्याची किंमत 74.5 लाखपासून सुरू होते. तर, GBL ची सुरुवातीची कंपनीने 63.8 लाख रुपये ठेवले आहे. दोन्ही कार आकाराच्या आणि दिसण्याच्या बाबतीत जवळजवळ सेमच आहे. फक्त या दोन्ही मधली एक इलेक्ट्रिक एसयूव्ही (SUV) आहे.

मर्सिडीज (Mercedes) EQB फीचर्स

मर्सिडीज EQB या SUV मध्ये क्लासिक एलईडी हेडलाईट आणि टेललाईट देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये अनेक विशेष वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. यामध्ये एलईडी स्ट्रिप, वायरलेस चार्जर, यूएसबी टाइप-सी पोर्ट, पॅनोरामिक सनरूफ, इलेक्ट्रॉनिक टेलगेट यांचा समावेश होतो. मर्सिडीज EQB 66.5kWh बॅटरी पॉवरसह बाजारात लाँच झाली आहे. या गाडीमधील इलेक्ट्रिक मोटार 225hp पॉवर आणि 390Nm टार्क जनरेट करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर या कारची बॅटरी 32 मिनिटात चार्ज केली जाऊ शकते.

मर्सिडीज GLB 

मर्सिडीज Benz GLB मध्ये 1.3L पेट्रोल इंजिन आणि 2.0L उपलब्ध आहे. हे इंजिन अनुक्रमे 161ho पॉवर आणि 250Nm पीक टार्क आणि 188hp पॉवर आणि 400NM टार्क निर्माण करू शकते. मर्सिडीज GLB SUV भारतीय बाजारामध्ये तीन प्रकारात लाँच करण्यात आलेली आहे. यामध्ये GLB 200, GLB 220D आणि GLB 220D 4M यांचा समावेश आहे. या गाडीची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत अनुक्रमे 63.8 रुपये, 66.8 लाख रुपये, 69.8 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे.

मर्सिडीज कंपनीच्या या नवीन गाड्या भारतीय बाजारपेठेमध्ये Jaguar F Pace या गाडीची स्पर्धा करेल. या गाडीची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 74.88 लाख रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!