नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात 43 नव्या मंत्र्यांचा समावेश केला. हा समावेश करताना जुन्या 12 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. नव्या चेहऱ्यांसह मोदी पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. या बदलाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी केंद्राने सहकार मंत्रालय स्थापन केले असून या मंत्रालयाचा कारभार आता गृहमंत्री अमित शाह सांभाळणार आहेत.
सहकाराच्या जोडीने राजकारण विकसित झाल्यानंतर सहकार चळवळ राजकारणाचा अड्डा होण्यास प्रारंभ झाला. त्यातून मग सहकार चळवळीची हळूहळू वाताहत होण्यास सुरुवात झाली. सहकारी संस्थांचा वापर राजकीय फायद्यासाठी करण्याचा एक पॅटर्न विकसित होऊ लागला. हे दोष दूर करण्यासाठी आणि देशातील सहकार चळवळीला बळकट करण्यासाठी तसेच त्याची पाळेमुळे अधिक खोलवर रुजवण्यासाठी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
दरम्यान, या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर देशातील सर्व सहकारी संस्थांना अधिक सक्षम करण्याचा सरकारचा निर्धार आहे, असे अमित शहा यांनी शनिवारी येथे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व सहकारी संस्था अधिक सक्षम करण्याचे ठरविले आहे, असे शहा यांनी ट्वीट केले आहे. शहा यांनी आयएफएफसीओ आणि कृभको यासारख्या संस्थांना ३८ हजार हेक्टर रिक्त जमिनीचा वापर करून बियाणेनिर्मिती क्षेत्रात काम करण्यास सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- रोहित शर्मा सर्वोत्कृष्ट कर्णधार : सूर्यकुमार यादव
- हरलीनच्या ‘त्या’ कॅचवर महिंद्रा यांची विशेष टिप्पणी, म्हणाले…
- शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चांवर निकम यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- दिडशतकी खेळीनंतर महमूदूल्लाहने निवृत्ती जाहिर करत दिला मोठा धक्का
- अबू आझमीच्या पुतण्याला एनसीबीचे समन्स
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
