पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. असे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील म्हणाले. कोरोना संकटाच्या कालावधीत सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
कात्रज कोंढवा रोड येथे नगरसेवक प्रकाश कदम यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी व्हिडीओ कॉन्फरसिंद्वारे खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या कार्यक्रमावेळी आमदार चेतन तुपे, नगरसेवक प्रकाश कदम, माजी नगरसेवक भारती कदम, प्रतिक कदम, डॉ. ओंकार खुने पाटील आदींसह वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी उपस्थित होते.
सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत असल्याचे सांगून जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना चाचण्यांचे प्रमाण राज्यात जास्त आहे. त्यामुळे वेळेत निदान व वेळेत उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. कोरोनाच्या झपाट्याने पसरत असलेल्या संसर्गाला तातडीने रोखण्यासाठी चाचण्यांमध्ये भरीव वाढ करत सर्व यंत्रणांनी रुग्ण संख्येच्या वाढत्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधांसह सज्ज रहावे, लसीकरण वाढवावे, आपण सर्व मिळून एकजुटीने कोरोनाच्या संकटातून निश्चितपणे बाहेर पडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- बीडमध्ये १०८६ रुग्णांची वाढ, ९५२ कोरोनामुक्त
- पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू
- राहुल गांधींसह सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह जाहिरात; काँग्रेसचं कंपनीविरोधात खळ्ळ-खट्याक !
- सकारात्मक बातमी! रुग्ण संख्या घटल्याने शहरातील पाच कोविड सेंटर रिकामे!
- बीड जिल्हाबंदी; नाकाबंदीवर पोलिसांसोबत शिक्षक देखील तैनात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

