Share

बीडमध्ये १०८६ रुग्णांची वाढ, ९५२ कोरोनामुक्त

Published On: 

बीड: जिल्हा कोरोनाच्या विळख्यात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच त्यातून बरे होणार्यांची संख्या देखील लक्षणीय असली तरी रुग्ण वाढीचे प्रमाण अधिक आहे. सोमवारी आणखी ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. सोमवारी जिल्ह्यात १०८६ नवे रुग्ण आढळले, तर ९५२ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या ५ हजार ६८६ रुग्ण उपचाराखाली आहेत.

जिल्ह्यात रविवारी कोरोना संशयित असलेल्या ३ हजार ५५७ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी २ हजार ४७१ एवढ्या लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला तर १ हजार ८६ लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील २०३, आष्टी ९८, बीड २४६, धारूर ६२, गेवराई ९९, केज १०९, माजलगाव ४९, परळी १०६, पाटोदा ४१, शिरूर २१, वडवणी ५२ येथील रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या ४८ हजार ३७८ एवढी झाली आहे. तसेच सोमवारी दिवसभरात ९५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आता एकूण कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ४१ हजार ८४० एवढा झाला आहे.

जिल्ह्यात सोमवारी आरोग्य विभागाच्या पोर्टलला आठ मृत्यूंची नोंद झाली. यात अंबाजोगाई तालुक्यातील ९० वर्षीय महिला, केज तालुक्यातील युसूफवडगाव येथील ७५ वर्षीय पुरूष, धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील ३६ वर्षीय पुरूष, केज शहरातील ६० वर्षीय पुरुष, माजलगाव तालुक्यातील वांगी येथील ७५ वर्षीय पुरुष, पाटोदा शहरातील ६५ वर्षीय महिला, अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील ५५ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई शहरातील सिल्व्हर सिटी भागातील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता एकूण मृत्युसंख्या ८५२ एवढी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!