Share

पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

Published On: 

जालना: भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथून जवळच असलेल्या पद्मावती धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी दुपारी घडली. पारध बु. येथील अभिषेक प्रवीण श्रीवास्तव आणि महेश शंकर काटोले अशी मयत युवकांची नावे आहेत.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. या घटनेतील मयत तरुण अभिषेक हा पारध येथील बसस्थानक परिसरात चहाची हॉटेल चालवत होता तर महेश हा घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दुसऱ्याच्या हॉटेलवर रोजंदारीने वेटर म्हणून काम करत होता.

लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत.त्यामुळे हे दोघेही रिकामेच फिरत होते. ते दोघे आणि इतर दोघे असे चौघेजण सोमवारी दुपारी गावाजवळ असलेल्या पद्मावती धरणात पोहण्यासाठी गेले होते. चौघांपैकी अभिषेक आणि महेश यांनी धरणात पोहण्यासाठी उड्या टाकल्या. मात्र ज्या ठिकाणी त्यांनी उड्या टाकल्या त्या ठिकाणी पाणी कमी पण गाळ मोठया प्रमाणात होता.त्यामुळे ते दोघे गाळात फसले इतका वेळ झाला तरी दोघे वर कसे येत नाहीत, म्हणून पोहता येत नसल्याने काठावर बसलेले त्यांचे मित्र घाबरले आणि त्याने आरडाओरडा केली. मात्र सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे आसपास कोणीच नव्हते.

त्यामुळे त्यांनी गावात फोन केला. त्याच क्षणी गावातील ग्रामस्थ मिळेल त्या वाहनाने पद्मावती धरणाकडे धावले.पोलीस आणि ग्रामस्थांनी मिळून मोठया प्रयत्नांनी त्या दोघांचे मृतदेह गाळातून बाहेर काढले. पोलिसांनी तात्काळ दोघांचेही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी केंद्र पिंपळगाव रेणुकाई येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. रात्री उशिरापर्यंत पोलीस कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!