Share

बीड जिल्हाबंदी; नाकाबंदीवर पोलिसांसोबत शिक्षक देखील तैनात

Published On: 

बीड: जिल्ह्यात कोरोन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तसेच संचारबंदी देखल लागू करणायत आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी देखील करण्यात आली आहे. जीळबंदिसाठी केज तालुक्यात तीन ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले आहे. तर यात पोलिसांच्या मदतीसाठी येथील शिक्षकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्हाबंदीसाठी केज पोलिसांनी दोन ठिकाणी तर युसूफवडगाव पोलिसांनी एक ठिकाणी चेकपोस्ट कार्यान्वित करून नाकाबंदी सुरू केली आहे. तर पोलिसांच्या मदतीसाठी २४ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता १ मेपर्यंत संपूर्ण लॉकडाउन लागु करण्यात आले आहे. जिल्हाबंदीसह आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पासची सक्ती करण्यात आली आहे.बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी केज-चौसाळा या रस्त्यावरील बोरगाव-हनुमंत पिंप्री चौफळा आणि मांजरसुंबा -अंबाजोगाई रस्त्यावर केज शहरातील शिवाजी चौक या दोन ठिकाणी चेकपोस्टवर नाकाबंदी सुरू केली आहे. तर युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे यांनी कळंब – केज – अंबाजोगाई रस्त्यावर मांगवडगाव फाट्याजवळ चेकपोस्टवर पोलिस तैनात करून नाकाबंदी सुरू केली आहे. तर चेकपोस्टवरील पोलिसांच्या मदतीसाठी केजचे गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी २४ शिक्षकांचीही नेमणूक केली आहे.

प्रवाशांची कसून चौकशी करुन त्यांच्याजवळ परवानगी असेल तरच प्रवेश देण्यात येत आहे. पास नसेल तर कोणत्याही सबबीवर त्यांना प्रवेश दिला जात नसून पास असलेल्याच प्रवाशांना प्रवेश दिला जात आहे. तरी जे ग्रामीण भागातील असतील तर त्यांची माहिती गटविकास अधिकारी यांना आणि शहरी भागातील असतील तर त्यांची माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना तात्काळ देण्याचे सूचित करण्यात आले आहे.केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांनी युसुफवडगाव ठाण्याने कळंब – केज रस्त्यावर मांगवडगाव पाटीजवळ कार्यान्वित केलेल्या चेकपोस्टला शनिवारी भेट देऊन पाहणी करीत पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय आटोळे, पोलिस नाईक जनार्धन कांबळे यांच्यासह नियुक्त पोलिस कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!