🕒 1 min read
मुंबई : एका कंपनीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक वापर करून जाहिरात केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्या कंपनीची ही जाहिरात आहे, त्यांच्या कार्यालयात जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध करत तोडफोड केली आहे.
स्टोरीया फूड्स या कंपनीच्या ऑफिसमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन करून ही तोडफोड केली आहे. या कंपनीने एक जाहिरात बनवलेली, ज्यात काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य दाखवले गेले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
त्याच्या निषेधार्थ आज भाई जगताप यांच्या आदेशानुसार मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस व युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी पूर्व येथील स्टोरीया फूड्सच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. यानंतर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
आदरणीय सोनियाजी गांधी व आदरणीय राहुलजी गांधी यांची STORIA कंपनीने जाहिराती मधून केलेल्या बदनामीला चोख उत्तर दिल्याबद्दल मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत तसेच युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक !!
असले घाणेरडे धंदे खपवून घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी!! ☝️ pic.twitter.com/e68iUXwrZG
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) April 27, 2021
दरम्यान, भाई जगताप यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिनंदन केलं आहे. ‘आदरणीय सोनिया गांधी व आदरणीय राहुल गांधी यांची STORIA कंपनीने जाहिराती मधून केलेल्या बदनामीला चोख उत्तर दिल्याबद्दल मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत तसेच युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक !! असले घाणेरडे धंदे खपवून घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी!!,’ असा इशारा भाई जगताप यांनी ट्विटद्वारे दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमची लोकं मरायला लागलीत, तुम्ही जीआर काय दाखवताय ? महापालिकेत वसंत मोरेंचा रौद्रावतार
- राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आंदोलनाचा गिरीश महाजनांकडून समाचार
- ‘पैसे देण्याचीही दानत असावी लागते हे ‘त्याने’ दाखवून दिले’, आव्हाडांचा निशाणा कोणावर?
- औरंगाबादेत एकाच दिवसात ‘रेकॉर्डब्रेक’ साडे अकरा हजार जणांचे लसीकरण!
- ‘बेस्ट’ सेवा बजावणाऱ्या सिल्लोडच्या बस वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
