Share

रिक्षाचालकांना शासनाकडून दिले जाणार अर्थसहाय्य

Published On: 

🕒 1 min read

जालना: कोरोना काळात ज्यांचे हातावर पोट आहे अशांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. हाताचे काम गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. संचारबंदी असल्यामुळे नागरिक कुठे बाहेर निघत नाहीत त्यामुळे रिक्षा सुद्धा बंद आहेत. रिक्षाचालकांना यामुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. मात्र आता शासन रिक्षाचालकांना आर्थिक सहाय्य देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांच्या बँक खात्यात शासनाच्या वतीने दिले जाणारे अर्थसाहाय्य २१ मेपासून जमा करण्यात येत असल्याची माहिती जालना जिल्हा रिक्षा चालक-मालक कृती समितीचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी केले आहे. कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्यातील हातावर पोट असलेल्या जनतेचे हाल झाले आहेत, रिक्षाचालक व रिक्षा मालकांचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. राज्यात एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत हातावर पोट असलेल्या जनतेला अर्थसाहाय्य देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली १९ एप्रिल रोजी एक बैठक घेण्यात आली, या बैठकीत परवानाधारक रिक्षाचालकांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये अर्थसाहाय्य देण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली.

परवानाधारक रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्रे सादर करायची नाहीत, केवळ ऑनलाइन प्रणालीवर त्यांचा वाहन क्रमांक व आधार कार्ड क्रमांक नोंद करावयाचा आहे. संगणक प्रणालीवर सदर माहिती प्रमाणित करण्यात येईल, ही कार्यप्रणाली आयसीआयसीआय बँकेच्या वतीने विकसित करण्यात आली आहे, त्याबाबतची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. संचारबंदीच्या या परिस्थितीत मात्र या उपक्रमामुळे अनेक रिक्षावाल्यांना आधार मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!