🕒 1 min read
मुंबई : मराठी सिनेसृष्टीमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचे नाव नेहमीच पुढे असते. आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने स्वत: चे भकम स्थान निर्माण केले आहे. तसेच तिच्या सौंदर्याने अनेकान घायाळ केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये तिने उत्तम भूमिका निभावल्या आहेत.
अभिनयाच्याबाबत ती जितकी अॅक्टिव असते तितकीच तेजस्विनी सोशल मिडियावर देखील अॅक्टिव असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते. शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते.
https://www.instagram.com/p/CPNEDG6FezN/?utm_source=ig_web_copy_link
तर आता तिच्या वाढदिवशी तिने चाहत्यानां एक सरप्राईज दिलं आहे. त्यामुळे अनेकांन आनंदाचा धक्का बसला आहे. तिने आता चित्रपट निर्मितीसाठी काम करयाचं ठरवलं आहे. आणि त्यासाठी तिने तिच्या नव्या प्रोडक्शन हाऊसची घोषणा केली आहे. क्रियेटिव्ह व्हाईब (Creative Vibe) अस या प्रोडक्शन हाऊसचं नाव असून तेजस्विनीने तिचा मित्र संतोष खेर याच्यासोबत हे सुरू केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने सगळ्यानांच चकित केलं आहे. त्यामुळे ता एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक निर्माती देखिल बनत आहे. तिच्या वाढदिवसनिमित्त चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- लुटेरी दुल्हन! सोनू शिंदे युवतीचा कारनामा, चक्क १३ लग्न करत १३ मुलांना लाखोंना गंडवले
- वडिलांच्या मृत्युला रुग्णालयच जबाबदार असल्याचा संभावना सेठने केला आरोप
- न्यूझीलंडचा ‘हा’ फलंदाज अश्विनला सामोरे जाण्याची अशी करतोय तयारी
- ‘माझा होशील ना’ मालिकेला रंजक वळण; सईला आदित्य देणार खास सरप्राईज
- चाहत्याच्या प्रश्नावर सूर्यकुमारने दिले अभिनास्पद उत्तर ; विराट-धोनीबद्दल विचारला होता प्रश्न
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
