जालना: संचारबंदी लागू होऊन आता संपायची वेळ आली मात्र लोकांच बाहेर फिरणं काही थांबलं नाही. संचारबंदीचे उल्लंघन करत बाहेर फिरणाऱ्या नागरिकांचे चाचण्या करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील भोकरदन शहरात अश्याच चाचण्या करण्यात आल्या. यात एकूण पाच जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. दोन दिवसांमध्ये एकूण ३२५ जणांची चाचणी करण्यात आली होती. रुग्णांची संख्या जरी आता काही प्रमाणात कमी होत असली तरी कोरोनाचे संकट अजून काही गेले नाहीये, त्यामुळे नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये, असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे.
शुक्रवारी दुपारपर्यंत केलेल्या ११६ जणांच्या तपासणीत दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शनिवारी दिवसभरात २०८ जणांच्या कोरोना अँटिजन टेस्ट पैकी ३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी सूट देण्यात आली आहे. त्यानंतर विनाकारण नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सूचनांचे पालन न करता नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याने व नागरिक विनाकारण फिरत असल्याने पोलीस प्रशासन, नगरपरिषद व आरोग्य विभाग यांच्या वतीने रस्त्यावर फिरणाऱ्या व बिना मास्क फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजन तपासणी करण्यात आली. यामध्ये मालखेडा, पंढरपूरवाडी येथील दोन जण पॉझिटिव्ह आले असल्याचे सांगण्यात आले. त्यांना भोकरदन येथील कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- वरुडी येथे भरधाव जीप घुसली थेट पोलिसांच्या चेकपोस्टमध्ये; ३ पोलीस जखमी
- ‘धोनीमुळे मला जास्त खेळण्याच्या संधी मिळाल्याच नाहीत’ ; साहाचे गंभीर आरोप
- लुटेरी दुल्हन! सोनू शिंदे युवतीचा कारनामा, चक्क १३ लग्न करत १३ मुलांना लाखोंना गंडवले
- वडिलांच्या मृत्युला रुग्णालयच जबाबदार असल्याचा संभावना सेठने केला आरोप
- न्यूझीलंडचा ‘हा’ फलंदाज अश्विनला सामोरे जाण्याची अशी करतोय तयारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

